![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
|
धोंडोपंत
उवाच
![]() धोंडोपंत उवाच...ज्योतिष्यावरचा ब्लॉग... दचकलात ना? पण हे खरे आहे. ज्योतिष सांगताना येणारे वेगवेगळे अनुभव, आपसूकच पाहिले जाणारे माणसांचे विविध नमुने, स्वभाव... कृष्णमूर्ती पद्धतीबद्दल मार्गदर्शन, क्वचित साधे-सोपे उपाय अशी मेजवानी... सोबत लेखकाच्या एक से एक गझला. क्वचित विविध विषयांवर मंथन. मोडी लिपीवर चर्चा आणि मराठी सणांचे महत्त्व सांगणारे खास कोकणी लिखाण. जगभरातले लाखोंच्या संख्येतले वाचक, जातक आणि आपल्याच अंदाजाचे पृथक्करण करायचा प्राजंळपणा ...ई-ज्योतिष सांगायची पद्धत; जग मॉडर्न झाल्याची पदोपदी जाणीव करून देणारी... थोडक्यात, मराठी ब्लॉग्सचे भविष्य असणाऱ्या धोंडोपंत आपट्यांच्या या ब्लॉगला भेट द्यायलाच हवी ... Link - http://dhondopant.blogspot.com/ या ब्लॉगबद्दल थेट धोंडोपंत यांच्याच शब्दांत जाणून घेऊ या ना ! "धोंडोपंत उवाच' हा ब्लॉग आम्ही लिहायला सुरवात करून आता तीन वर्षे झाली आहेत. "अल्पावधीत लोकप्रियतेचा कळस गाठलेला ब्लॉग', असे या ब्लॉगचे वर्णन करता येईल. त्यातही ज्योतिषासारख्या रटाळ विषयाला वाहिलेल्या, एखाद्या प्रादेशिक भाषेतील ब्लॉगने एवढी लोकप्रियता मिळवावी, ही आमच्यासाठी फारच आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. पहिल्याच वर्षी "ब्लॉग माझा' या स्टार माझा वाहिनीतर्फे मराठी ब्लॉगसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत या ब्लॉगला पारितोषिक मिळाले आहे. आमची हा ब्लॉग सुरू करण्यामागची प्रेरणा ही की, ज्योतिषशास्त्राबद्दल समाजात जे अनेक गैरसमज पसरले आहेत, ते दूर व्हावेत. समाजाला या दैवी शास्त्राची महती पटावी. तसेच आमच्या हातून जे काव्य किंवा इतर काही विषयांवर थोडेफार लिहिले जाते, ते वाचकांसमोर यावे. आमच्या या उद्दिष्टांत आम्ही सफल झालो आहोत, असे म्हणायला हरकत नाही. या ब्लॉगवर ज्योतिषशास्त्र मांडतांना, "केस स्टडीज्'च्या माध्यमातून मांडणे हाही विचार होता. कारण मराठीच नव्हे; तर इतर भाषांमधील जे ज्योतिषविषयक ब्लॉग आहेत किंवा वेबसाईट्स आहेत, त्यात बहुतकरून अमूक योग असेल तर तमूक होते, असे असेल तर तसे होते, या स्वरूपाचे लेखन झालेले आढळते. प्रत्यक्ष कुंडल्या सोडवून दाखवलेल्या नाहीत. खरे तर असल्या वायफळ बडबडीला काही अर्थ नाही. कुंडली समोर आल्यावर तुम्ही काय तर्कशास्त्र वापरलेत, शास्त्राच्या कुठल्या सिद्धान्ताला अनुसरून भाकीत केलेत आणि त्याचे परिणाम काय मिळाले, हे सांगणं महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शास्त्रात जशा अपपवृत्ती फोफावलेल्या असतात, तशा ज्योतिषशास्त्रातही आहेतच. जातकांना नको त्या शांती करायला सांगणे, हजारो रपयांची रत्ने विकणे यासारख्या अपप्रवृत्तींच्या विरोधातही आम्ही लेखन केलेले आहे. या ब्लॉगचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, आम्ही जसे आहोत, जसे बोलतो, तसेच लेखन इथे झाले आहे. स्वतःला मुखवटे लावून लिहिण्याचा खटाटोप आम्ही कधीच केला नाही, करणारही नाही. आम्ही आहोत हे असे आहोत, पटत असेल त्यांनी वाचावे. प्रामाणिकपणा हाच लेखनाचा एकमेव निकष आहे आणि जगात तोच महत्त्वाचा आहे. करविली तैसी । केली कटकट । वाकडी की नीट । देव जाणे । - धोंडोपंत - विनायक पाचलग |
||
|
तुमची प्रतिक्रिया लिहा ... blog comments powered by Disqus |
||