"पैसा फार महत्वाचा आहे बाबा ऽऽऽ. फार जपून वापरला पाहिजे त्याला. कधी कामाला येईल काही सांगता येत नाही. फार जप.....' "ये ऽऽऽ चूप बस की जरा. मला जरा काम करू दे की. तुला नाहीत का कामं ?'
"वत्सा ! स्वत:चे असे हाल करून घेऊन काम करू नकोस. शेवटी मोकळ्याच हाताने परत जायचे आहे. पैशाच्या मागे एवढं लागू नकोस.' "आई गं! कसली पलटी मारतोयस आत्ताच्या आत्ता ! आणि हे "बाबा', "वत्सा' म्हणजे काय? असा काय बोलतोयस?' "अरे अजाण बालका, मी समाजाला मार्गदर्शन करायचा सराव करतो आहे.'
"हे असं? आणि या भाषेत?'
"होय. कारण साधी सोपी भाषा लोकांना समजतच नाही. म्हणून असं बोलायचं. एकदा एक तर पुढच्या वेळी त्याच्या उलट. लोकं काहीही ऐकतात. आणि कळलं नाही की पैसे देतात.' "हे ज्ञान तुला कुठून प्राप्त झालं?'
"अनुभवासारखा दुसरा गुरू नाही मित्रा ! तुला काय वाटतं, मी कंगाल कसा झालो? त्यामुळे आता हा मार्ग. येतोस का माझा जोडीदार म्हणून ? चांगलं पॅकेज देईन.' "क्षमा महाराज. मी आहे तिथं बरा आहे.'

-सारंगा
तुमची प्रतिक्रिया लिहा ...

blog comments powered by Disqus