मैले हो जाते है रिश्‍ते भी...।
नाती आणि कपडे यांचा तसा काय संबंध? डोक्‍याला किती ताण दिला तरी असा संबंध काही शोधता येणार नाही. मुळातच तसा काही संबंध नसल्यामुळे तो सापडणेही मुश्‍किलच. पण खूप विचार केला तर असा संबंध आहे, हे समजून येईल! निदान कविवर्य निदा फाजली यांना तरी तसे वाटते. अन्यथा, या विषयावर अतिशय नेमका आणि अर्थपूर्ण शेर त्यांच्या लेखणीतून उतरलाच नसता. गैरसमजांची धूळ, द्वेषाची माती, आढीचे डाग, संशयाचा मळ...यामुळे अनेक नाती मळलेली आपण पाहत असतो. आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणं दिसतील. ही नाती या गोष्टींनी मळू द्यायची नसतील तर मग काय करायचं? रोजच्या रोज ती साफ करायची! धुवायची. म्हणजेच संवादात दरी पडू द्यायची नाही. विसंवाद वाढू द्यायचा नाही! पुढे दिलेला हा शेर हाच तर सल्ला देत आहे आपल्याला!

मैले हो जाते है रिश्‍ते भी लिबासों की तरह
दोसती हर दिन की मेहनत है चलो यूंही सही ।
- कुलदीप
तुमची प्रतिक्रिया लिहा ...

blog comments powered by Disqus