"फुलावर बसलेले फुलपाखरू' असा साधा-सोपा विषय गेल्या आठवड्यात देण्यात आला होता. पण हा विषय तसा साधा-सोपा मुळीचच नव्हता. एकतर चंचल फुलपाखराला कॅमेऱ्यात बंदिस्त करायचे, तेही फुलावर बसलेल्या...खरोखरच काही क्षणांतच हा फोटो टिपावा लागणार होता. तोही शुभेच्छापत्रांवर आपण पाहत आलो आहोत तसा देखणा, सुंदर वगैरे. दुबईच्या संगीता बोरकर यांनी तो क्षण नेमका पकडला आणि सोबतचे छायाचित्र पाठवले. अगदी शुभेच्छापत्रावर शोभून दिसेल की नाही हे फुलावर बसलेले फुलपाखरू? (या आठवड्याचा विषय आहे ः पानावरील दवबिंदू)
(सूचना ः फोटो स्वतः काढलेलाच असावा)
तुमची प्रतिक्रिया लिहा ...

blog comments powered by Disqus