![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
|
देवचाफा
मराठी कथाविश्वात (कै.) विद्याधर पुंडलिक यांचे स्वतंत्र स्थान असून, त्यांचा असा एक वाचकवर्ग आहे. पुंडलिक यांच्याच शब्दांत सांगायचे तर कथेचा प्रपंच त्यांनी नेटका आणि नेमका केलेला आहे. "पोपटी चौकट', "टेकडीवरचे पीस', "देवचाफा', "माळ' हे त्यांचे कथासंग्रह. "देवचाफा'ची पहिली आवृत्ती 1979 साली प्रसिद्ध झाली. या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही याच वर्षी बाजारात आली आहे. "अर्धूक', "सती', "त्याला मिळाला वनमाळी', "प्रवास', "अखेरची रात्र' अशा पाच कथा "देवचाफा'मध्ये आहेत. "देवचाफ्या'च्या निमित्ताने' या शीर्षकांतर्गत पुंडलिक यांनी व्यक्त केलेले मनोगत, हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य. मराठी कथेकडे आत्मीयतेने पाहणाऱ्या प्रत्येक वाचकाने पुंडलिक यांचा हा "देवचाफा' आवर्जून वाचायला हवा. मुंबईच्या मौज प्रकाशनाने या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. |
||
|
तुमची प्रतिक्रिया लिहा ... blog comments powered by Disqus |
||