![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
|
सोयाबीन लाडू
साहित्य ः अर्धा किलो सोयाबीन, अर्धा किलो गहू, अर्धा किलोपेक्षा थोडे कमी शुद्ध तूप, अर्धी वाटी भाजलेल्या तिळाचा कूट, अर्धी वाटी भाजलेले खोबरे बारीक केलेले, एक वाटी खजुराचे बारीक तुकडे, बदाम-काजू पावडर (ऐच्छिक), अर्धा किलो गूळ किसलेला, जायफळ पूड, वेलची पूड. कृती ः प्रथम सोयाबीन व गहू भाजून दळून आणावे. दळलेले पीठ तुपामध्ये रंग बदलेपर्यंत खमंग भाजावे. गॅस बंद करून कढईत तिळाचे कूट, बारीक केलेले खोबरे, गूळ, खजुराचे तुकडे, काजू-बदाम पावडर, जायफळ-वेलची पूड मिसळावी. साधारण थंड झाल्यावर लाडू वळावेत. - मृणाल धर्मे इडली फ़्राय साहित्य ः दहा-बारा तयार इडल्या, चाट मसाला एक चमचा, तिखट अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, तेल. कृती ः इडलीचे काप करून घ्या (एका इडलीचे चार). कढईत तेल गरम करून या सर्व इडल्या मध्यम आंचेवर, गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या. गरम असतानाच त्यावर चाट मसाला व मिरची पावडर आणि मीठ अगदी थोडे भुरभुरा व चागंले मिक्स करा. गरम गरम इडली फ़्राय टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावे. टीप - मीठ टाकताना बेतानेच टाकावे; कारण इडली बनवताना त्यात मीठ घातलेले असते. - निवेदिता वाळिंबे, फलटण. |
||
|
तुमची प्रतिक्रिया लिहा ... blog comments powered by Disqus |
||