ईसकाळ पॉडकास्ट - ऑडिओ आणि व्हिडिओ पॉडकास्ट सर्व्हीस
वाचकांना नेहमीच काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न करणाऱ्या इ-सकाळने आता पॉडकास्टींग सुरू केले आहे. यामुळे वाचकांना इ-सकाळवरचे त्यांचे आवडते ऑडिओ/ व्हिडिओ डाऊनलोड करून ऑफलाईन ऐकता/ पाहाता येतील. एक जानेवारीपासून इ-सकाळवर प्रसिद्ध झालेले ऑडिओ पॉडकास्टिंगमुळे एकाच ठिकाणी वाचकांना उपलब्ध होणार आहेत. यासाठी तुमच्याकडे आयट्यून, मिरो किंवा एखादा ऑडिओ एग्रीगेटर असणे आवश्यक आहे. लवकरच याठिकाणी तुम्हाला व्हिडिओही पाहाता येतील.
जनादेशाचा आदर - नितीशकुमार
बिहारच्या नागरिकांनी दिलेल्या जनादेशाचा मी आदर करतो आणि पुन्हा काम करण्यासाठीच आम्हाला निवडून दिले आहे, असे मी मानतो. या निवडणुकीत महिलांसह तरुणांचा उत्साह प्रथमच दिसला, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी निवडणूक निकालानंतर सांगितले.
Download
लेहच्या मदतीला पुणेकर...!
- सर्वत्र चिवट चिखल पसरलेला... बघावे तिथे साचलेले पावसाचे पाणी... रस्त्यांवर आलेले पाण्याचे नवीन प्रवाह... मोडक्या-तोडक्या घरांची ओसाड गावं... कुठे दुचाकी चिखलात रुतून पडलेली, तर कुठे पै-पै जमवून विकत घेतलेले घरातील समान रस्त्यावर आलेले... ढगफुटीनंतर लेहला भेट दिल्यावर "मैत्री' या समाजसेवी संस्थेचे कार्यकर्ते मंगेश जोशी यांना हा अनुभव आला. त्यांनी नैसर्गिक संकटग्रस्त लेहची पाहणी करून तेथील पीडितांना तत्काळ हव्या असलेल्या आणि दीर्घकालीन मदतीची एक यादी तयार केली आहे. त्यानुसार ते लोकांकडून आर्थिक किंवा वस्तूंच्या स्वरूपात मदत गोळा करीत आहे. जाणून घेऊया त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दांत...
Download
व्याजदर वाढण्याची शक्यता (ऑडिओ)
चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा सामान्य ग्राहकांवर काय परिणाम होईल, याबद्दल सांगताहेत आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आणि 'सकाळ'चे सहसंपादक चंद्रशेखर पटवर्धन...
Download



Team eSakal